दिवाळीनिमित्त हिंगोली जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना 2 लाख 21 हजार 297 किटचे शंभर रुपये या सवलतीच्या दराने वाटप

Khozmaster
3 Min Read

पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन  हिंगोली (जिमाका), दि. 06 : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दि. 4 ऑक्टोबर, 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी दिवाळीनिमित्त एक किलो रवा, एक किलो चनादाळ, एक किलो साखर व एक लिटर पामतेल या चार शिधाजिन्नसांचा समावेश असलेला एक शिधाजिन्नस संच प्रती शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीद्वारे वितरीत करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.  हिंगोली जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेचे 29 हजार 612, प्राधान्य कुटुंब योजनेचे 01 लाख 53 हजार 838 तसेच एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील 37 हजार 847 अशा एकूण 2 लाख 21 हजार 297 पात्र शिधापत्रिकाधारकांना 2 लाख 21 हजार 297 किटचे वाटप करण्यात येणार आहे. तालुकानिहाय अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारक व आश्यक किटची संख्या पुढीलप्रमाणे आहे. हिंगोली तालुक्यात अंत्योदय अन्न योजनेचे 7 हजार 756, प्राधान्य कुटुंब योजनेचे 31 हजार 549 तसेच एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील 9 हजार 732 पात्र शिधापत्रिकाधारकांना 49 हजार 37 किटची आवश्यकता आहे. कळमनुरी तालुक्यात अंत्योदय अन्न योजनेचे 6 हजार 249, प्राधान्य कुटुंब योजनेचे 29 हजार 698 तसेच एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील 10 हजार 264 पात्र शिधापत्रिकाधारकांना 46 हजार 211 किटची आवश्यकता आहे. सेनगाव तालुक्यात अंत्योदय अन्न योजनेचे 6 हजार 216, प्राधान्य कुटुंब योजनेचे 27 हजार 888 तसेच एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील 6 हजार 378 पात्र शिधापत्रिकाधारकांना 40 हजार 482 किटची आवश्यकता आहे. वसमत तालुक्यात अंत्योदय अन्न योजनेचे 5 हजार 753, प्राधान्य कुटुंब योजनेचे 40 हजार 692 तसेच एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील 6 हजार 410 पात्र शिधापत्रिकाधारकांना 52 हजार 855 किटची आवश्यकता आहे. औंढा नागनाथ तालुक्यात अंत्योदय अन्न योजनेचे 3 हजार 638, प्राधान्य कुटुंब योजनेचे 24 हजार 11 तसेच एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील 5 हजार 63 पात्र शिधापत्रिकाधारकांना 32 हजार 712 किटची आवश्यकता आहे. तालुका पुरवठा कार्यालय व रास्तभाव दुकानदार यांनी याबाबत अधिकाधिक प्रसिध्दी द्यावी.  हे शिधाजिन्नस संच अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रती शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीद्वारे प्रती संच शंभर रुपये या सवलतीच्या दराने वितरीत करण्यात येणार आहे. याचा सर्व पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

 

0 6 6 8 3 9
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18:07