आतापर्यंत सर्वाधिक इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरीला
भुरट्या चोरांच्या मुसक्या पोलिसांनी आवळने अत्यंत गरजेचे
योगेश नागोलकार
राहेर:- पातूर तालुक्यांतील आलेगाव सह परिसर आदिवासी बहुल भाग असलेल्या व चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आलेगाव व पांढुणाॅ उंबरवाडी पिंपळडोळी, नवेगाव ,येथील परिसरामध्ये गत काहीं दिवसापासून भुरटे चोरांची गँग सक्रिय होतांना दिसतं आहे. त्या मुळे चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरा मुळे परिसरातील नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या छोट्या मोठ्या चोरीमधून मोठी चोर रोबरी करण्याची शक्यता परिसरामध्ये चांगलीच रंगली आहे . गत मागील काही महिन्यांमध्ये झालेल्या चोऱ्या . वन फॉरेस्ट उपजत नाका पांढुणाॅ येथील स्त्रेट लाईट चे बॅटरी चोरी सर्व . वसाली येथील दोन किलोमीटर लावलेले लाईट व बॅटरी सर्व चोरी. उंबरवाडी येथील जिल्हा परीषद शाळेमध्ये लावलेले दोन टीव्ही चोरी. व इतर साहित्या चोरी.पिंपळडोळी येथील फॉरेस्ट विभागाचे विश्रामगृह व राहायच्या क्वार्टर मधून तीन मोठी टीव्ही चोरी व कॉम्प्युटर चोरी व इतर साहित्य. पिंपळडोळी येथील जिल्हा परिषद शाळेमधून टीव्ही पंखे व इतर साहित्य चोरी आलेगाव येथील शाळेमध्ये चोरी. आलेगाव येथील घरामध्ये चोरी.निर्गुना धरणावर शेतीच्या पाण्यासाठी टाकलेले शेतकऱ्याचे मोटार पंप चोरी. व शेतकऱ्याने आपल्या शेतातील प्राण्याच्या रक्षणासाठी आणलेले झटका मशीन सुध्हा अनेक चोरीला गेल्या आहेत. या व्यतिरिक्त सुध्हा गत काहि महिन्यांमध्ये अनेक चोऱ्या परिसरामध्ये झालेल्या आहेत . या मधिल ऐकाही चोरीचा छडा उलगडा आतापर्यंत लागलेला नाही. त्या मुळे सुद्धा या चोरांची चोरी करण्याची पायरी वाढली . त्या मुळे भुरट्या चोरची परिसरामध्ये दहशत निर्माण झाली आहे . त्या मुळे त्वरित या भुरट्या चोरांच्या मुसक्या पोलिसांनी आवळने गरजेचे आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये यांच्या कडून मोठी घटना होणारं नाही.