इ केवायसी साठी अधिकारी गावो गावी फिरुन;परिक्षेत पाटील यांचे आवाहन
सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील पंतप्रधान किसान सन्मान निधी चा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करणे आवश्यक आहे साठी यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली होती यात पुन्हा वाढ करण्यात आली असून आता *7 सप्टेंबर 2022* पर्यंत शेतकऱ्यांना ई-केवायसी करता येणार आहे यासाठी कृषी विभागाचे अधिकारी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करत आहेत. सोयगाव तालुका कृषी अधिकारी संपत वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली श्री परीक्षीत पाटील कृषी सहाय्यक,कृषी पर्यवेक्षक हेमंत देशमुख जरंडी यांच्या वतीने वतीने लाभार्थ्यांना फोन द्वारे, सोशल मीडिया द्वारे, गावात दवंडी द्वारे, भेटी घेऊन केवायसी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे देशांमधील खेडेगावातील सर्वात मोठा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणजे शेती देशाची अर्थव्यवस्था सुद्धा मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे अशांमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे या अनुषंगाने शासनामार्फत विविध योजना राबवल्या जातात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना त्यापैकीच एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये याप्रमाणे मानधन दिले जाते ही एकत्रित रक्कम शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दोन-दोन हजार रुपये प्रमाणे त्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 हप्ता ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आता शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत 12व्या हप्त्याची परंतु 12 हप्ता मिळवण्यासाठी सरकारमार्फत शेतकऱ्यांना ही केवायसी ची अट ठेवण्यात आलेली आहे ही केवायसी न करणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे सरकारमार्फत पीएम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये दिले जाणार नाही ही केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी एक संधी देत अंतिम मुदत वाढवून 7 सप्टेंबर 2022 करण्यात आलेली आहे या योजनेपासून एकही शेतकरी वंचित राहू नये या उद्देशाने तालुका कृषी अधिकारी कार्यालय सोयगाव च्या वतीने तालुका कृषी अधिकारी संपत वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील परीक्षीत पाटील कृषी सहाय्यक जरंडी यांच्या वतीने लाभार्थ्यांना फोन द्वारे, सोशल मीडिया द्वारे, गावात दवंडी देऊन ,भेटी घेऊन इ केवायसी करण्यात जनजागृती केली जात आहे. तसेच तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक शेवटच्या व्यक्तीपर्यंत जाऊन इ केवायसी करण्यास प्रसिद्धी करून सांगत आहे.