वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर वाशिम ; दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वाशिम च्या स्थानिक श्री. बाकलीवाल विद्यालय वाशीम येथे महापुरुषांच्या जीवन चरित्रावरती सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन हे माळी कर्मचारी सेवा मंडळ, माळी युवा मंच,अखिल भारतीय माळी महासंघ व सावित्रीबाई फुले महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन हे करण्यात आले होते.
आजच्या या सामान्य ज्ञान स्पर्धे करिता विविध शाळेमधून तब्बल ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. तर यावेळी विद्यार्थ्यांना लेखन साहित्य हे आर.टी.ओ आधिकरी मनीष मडके यांनी दिले.तर मंडळाच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला.
महापुरुषांनी केलेल्या कार्याचा अभ्यास शालेय विद्यार्थ्यांना हवा व त्यांच्या आदर्श घेऊन जीवनात चरित्र आत्मपरीसात व्हावे हा या मागचा उद्देश आहे. या परीक्षेत करिता वाशिम शहरातील शाळांचा सहभाग होता. यामध्ये ( अ ) गटात वर्ग ५ ते ८ ,( ब ) गटात वर्ग ९ ते १२ वा अश्या गटातील विद्यार्थी यांनी सहभागी घेतला होता. यातून प्रत्येक गटातील प्रथम द्वितीय व तृतीय विद्यार्थ्यांना रोख रक्कम सन्मान चिन्ह व सन्मान प्रमाणपत्र हे ३ जानेवारी २०२४ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले चौक देवपेठ येथे सकाळी ९:०० वाजता मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. यावेळी या स्पर्धेसाठी ज्यांचे विशेष सहकार्य हे ज्येष्ठ मार्गदर्शक केशव खासबागे,माळी कर्मचारी सेवा मंडळ अध्यक्ष गजानन राऊत, समाधान गिरे, रवी इंगोले, राजीव खोडे, सचिव संभाजी साळसुंदर, प्रशांत मोरे प्रवीण उलेमाले, अमोल काळे ,वैभव उगले, माळी युवा मंच जिल्हा अध्यक्ष नागेश काळे,अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हाध्यक्ष गजानन ठेंगडे, राम इंगळे , संदीप भांदुर्गे, कैलास भांदुर्गे ,कैलास वानखेडे,संजय नागुलकर, नारायण ठेंगडे, महेश राऊत, सावित्रीबाई महिला मंच जिल्हाध्यक्ष किरणताई गिरे, उपाध्यक्ष रेखाताई राऊत ,शहराध्यक्ष छाया मडके, रेखा वानखेडे मॅडम ,संगीता ताई मोहळे , टेकाळे मॅडम,जाधव मॅडम,अजय रणखांबे, महादेव जाधव, वैद्य, वानखेडे मेजर, तायडे यांचे होते यावेळी सर्वांची उपस्थिती होती.