हिंगोली– खासदार हेमंत पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख आनंद जाधव यांच्याकडून सभास्थळाची पाहणी; बाळापूर येथे १० जानेवारीला होणार जाहीर सभाआगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे नवीन वर्षात ६ ते ३० जानेवारी असा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे बुधवारी (दि.१०) जानेवारी रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार हेमंत पाटील यांनी मंगळवारी ( दि. २ ) आखाडा बाळापूर येथे शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या सोबत संभा सभास्थळाची पाहणी केली व सभेच्या तयारीमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याबाबत सर्वती खबरदारी घेण्याच्या शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सूचना दिल्या.
बाळापूर येथे होणाऱ्या सभेची जय्यत तयारी सुरु झाली आहे. या ठिकाणी खासदार हेमंत पाटील यांच्यासह संपर्कप्रमुख आनंद जाधव, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे, नांदेड जिल्हाप्रमुख आनंद पाटील बोंढारकर, जिल्हा प्रमुख उमेश मुंडे, अशोक उमरेकर, शिवाजी बोंढारे, शंकर पिनोजी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
हिंगोली जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून खासदार हेमंत पाटील यांनी पक्षवाढ आणि सार्वजनिक हिताचे अनेक उपक्रम आणि नाविन्यपूर्ण योजना व महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेऊन पूर्णत्वास नेले आहेत. मागील निडवणुकीत भरघोस मताधिक्याने निवडून आल्यानंतर २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत सुद्धा शिवसेनेचा हा बालेकिल्ल्ला मजबूत राहील असा विश्वास व्यक्त करत आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरु केली आहे. यासंदर्भात मुंबई येथे नुकतीच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली . यावेळी राज्याचे कतर्व्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी उपस्थितांना नव्या जोमाने निवडणुकीच्या तयारीला लागावे अशा सुचना दिल्या आहेत . त्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्र दौऱ्याचे नियोजन केले असून, याचा पहिला टप्पा यवतमाळ, वाशीम आणि रामटेक पासून होणार आहे. हिंगोली येथे दि. १० जानेवारी २०२४ रोजी कळमनुरी तालुक्यातील बाळापूर येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेची मोठी जय्यत तयारी सुरु असून खासदार हेमंत पाटील यांनी आज ( दि. २ ) रोजी शिवसेना पदाधिकाऱ्यासमवेत सभास्थळाची पाहणी केली व सभेच्या नियोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी अश्या सूचना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या.