संगीता तायडे.
दै, खोजमास्टर.
हिंगणा.
खुशिला एम. बी. बी. एस च्या दुसऱ्या वर्षी सुध्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
वाडी येथील गरीब परिवारातील झोपडीत राहणारी कु. खुशी राजेंद्र करणाके या विद्यार्थ्यीनीचा उस्मानाबाद येथे एम. बी. बी. एस च्या शिक्षणासाठी नंबर लागला असुन आता ती दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. पहिल्या वर्षी सुध्दा मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पारखी यांच्या हस्ते १० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली होती. चार वर्षेपर्यंत प्रत्येक वर्षी १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते.हे खुशिचे एम.बी.बी.एस चे दुसरे वर्षे या वेळी सुध्दा खुशिला १०हजार रुपये आर्थिक मदत देवून खुशीचा एम. बी. बी. एस चा दुसऱ्या वर्षाला सुध्दाअडचण दूर करण्याचा प्रयत्न मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष नागपूर अनिल पारखी यांनी केला. पारखी हे सतत कोणत्या ना कोणत्या गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी अग्रेसर असतात. गरीब ,गरजू लोकांना मदत करण्यासाठी दानदात्यानी समोर येऊन मदत करावी अशी मनसे कडून यावेळी विनंती करण्यात आली.मनसे चे जिल्हा अध्यक्ष आदित्य दुरूगकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष अनिल पारखी, नागपूर तालुका अध्यक्ष दीपक ठाकरे,वाडी शहर अध्यक्ष धनराज गिरीपुंजे,नागपुर तालुका उपाध्यक्ष राकेश चौधरी ,प्रीतम कंपल्लीवार,नागपुर तालुका सचिव सोमेश येडे , वाडी शहर उपाध्यक्ष सचिन साहरे, संतोष पाल,वाडी विभाग अध्यक्ष मुकेश मुंडेले युवराज गिरीपुंजे वैभव तुपकर, ,नितीन पिटोरे व मनसे सैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.