सतिश मवाळ
मेहकर तालुक्यातील कासारखेड येथील लोकमान्य गणेश मंडळ यांच्या कडून गेले दहा दिवस गणरायाच्या आगमनाने चैतन्याचा जणू प्रवाहच गावातील प्रत्येकाच्या घरात वाहत होता.एक गाव एक गणपती वर्षे २२वे दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही गेल्या दहा दिवसांपासून मंडळाकडून धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले होते. आज गणपती बाप्पा ची गावामधुन धार्मिक गिते लावून त्या गितावर सर्व गणेशभक्तांनी आनंदोत्सव साजरा करत लोकमान्य गणेश मंडळ च्या वतीने हे चैतन्य पुढल्या वर्षीपर्यंत असेच कायम राहू दे, अशी प्रार्थना करीत श्री गणेश शांततेत मध्ये विसर्जन केले. सुख, समृद्धी नांदू दे, असेही साकडे घातले.यावेळी जाणेफळ पोलिस स्टेशन चे कर्मचारी शेळके व होमगार्ड उपस्थित होते.गावातील सर्व समाजातील गणेश भक्तांचे सहकार्य लाभले