बुलडाणा, दि. 10 : जिल्ह्यातील अनुसुचित जातीच्या गटई कामगारांनी पत्र्याचे स्टॉल मिळण्यासाठी सन 2022-23 या वर्षाकरीता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पात्र लाभार्थ्यानी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता दि. 13 जानेवारी 2023 पर्यंत सादर करता येईल.अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्जावर पासपोर्ट फोटो चिकटविलेला व परिपूर्ण अर्ज सादर करावा, अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आणि अनुसुचित जातीचा असावा, अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 40 हजार रूपये आणि शहरी भागासाठी 50 हजार रूपयांपेक्षा अधिक नसावे. यासाठी तहसिलदाराने निर्गमित केलेला उत्पनाचा दाखला आवश्यक राहणार आहे. अर्जदार वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे.अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल, ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावनी बोर्ड (कॅटॉनर्मेन्ट बोर्ड) किंवा महानगरपालिका यांनी त्यास भाड्याने, करारनाम्याने, खरेदीने अगर मोफत परंतू अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्याच्या स्व:मालकीची असावी इत्यादीपैकी एक प्रकारचे कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.अर्जदाराचा स्वत:चा प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे. शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्डची प्रत, आधार कार्डची प्रत, रहिवाशी दाखला इत्यादी स्वसाक्षांकित प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.या व्यवसाय योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या गरजू अर्जदारांनी विहित नमुना अर्ज विनामुल्य प्राप्त करुन घ्यावा. त्यासह आवश्यक कागदपत्रे, अर्जासोबत जोडून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे दि. 13 जानेवारी 2023 पर्यंत सादर करावेत. उशीरा आलेल्या अर्जाचा विचार केल्या जाणार नाही. अर्जदारांनी आवश्यक त्या कागपत्रासह परिपूर्ण अर्ज सादर करावेत, तसेच अर्जदारास अर्जातील त्रृटी पुर्तताबाबत या कार्यालयातून व्यक्तिगतरित्या कळविल्या जाणार नाही. अपुर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी कळविले आहे.