रविकांत तुपकरांना ताब्यात घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष; शर्वरी तुपकरांचे पोलीस स्टेशनसमोरच ठिय्या आंदोलन

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा: जिल्ह्यात २९ नोव्हेंबर रोजी कापूस सोयाबीनच्या योग्य नुकसान भरपाई मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे मंत्रालयाला घेराव घालून हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ही आंदोलन करण्याचे सरकारला अल्टिमेटम दिले होते. आज रविकांत तुपकर यांना पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर देखील रविकांत तुपकर आपल्या मागणीवर आणि आंदोलनावर ठाम असल्यामुळे त्यांना ताब्यात घेतले आहे. त्याचे आता तीव्र पडसाद संपूर्ण जिल्ह्यात आणि गाव-खेड्यापर्यंत पोहोचायला सुरुवात झाली आहे. जागोजागी त्यांचे समर्थक आणि शेतकरी आपला रोष आणि निषेध व्यक्त करत आहेत. शेतकरी रविकांत तुपकर यांच्या पाठीशी खंबीर असल्याचे चित्र असताना आता टायर जाळून आंदोलन उग्र करत आहे.

रविकांत तुपकर यांना घेतलेल्याची बातमी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर उदयनगर जामखेड तसेच पेठ येथे टायर जाळून कार्यकर्ते रस्त्यावर आले आहे. कुठलाही गुन्हा केला नसताना तुपकारांना ताब्यात केल्याचे त्यांचे म्हणणे आहे, असं शर्वरी तुपकर म्हणाल्या आहेत. तर रविकांत तुपकर यांनी कोणताही गुन्हा केला नसून त्यांना केलेली अटक त्वरित रद्द करण्यात यावी असा इशारा कार्यकर्ते देत आहे, असं शेतकरी संघटना कार्यकर्ता श्याम अवताळे म्हणाले आहेत.रविकांत तुपकरांच्या अटकेच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांचा बुलढाणा शहर पोलीस स्टेशन समोर फाशी घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रशासन आता अलर्ट मोडवर आलं असून अजूनही आंदोलन राज्यभर चिघळणार नाही याकरता प्रयत्न करत आहे. एकंदरीत अवघ्या काही तासांमध्ये तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

0 6 2 3 5 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *