सिंदखेड राजा महसूल विभाग अॅक्शन मोडवर

Khozmaster
2 Min Read

दुसरबीड:-विशेष प्रतिनिधी 

शासनाचे वाळू धोरण अद्याप ठरले नसल्याचा फायदा रेतीमाफिया घेत आहेत. सिंदखेड राजा तालुक्यात एकाही रेती घाटाचा लिलाव झालेला नसताना रेतीची चोरी सर्रास सुरू आहे. खडकपूर्णा नदी पात्रातून अवैध रेती वाहतुकीचा व्यवसाय जोमात आला आहे. परंतु सिंदखेड राजा महसूल विभागाने एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी दुसरबीड येथे दोन टिप्पर जप्त करून दंड आकारला. २ व ३ एप्रिल रोजी प्रत्येकी एक असे दोन टिप्पर पुन्हा पकडल्याने महसूल विभाग आता अॅक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. ‘पुण्य नगरी’ने प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर कारवायांचा वेग वाढला आहे.हिवरखेड पूर्णा नदीपात्रात २ एप्रिल रोजी अवैध रेती वाहतूक करताना टिप्पर (क्रमांक एमएच-२१-बीएच-४०४५) आढळून आले. यावरून सिंदखेड राजा महसूल विभागाच्या पथकाने टिप्परवर कारवाई केली. किनगाव राजा पोलीस स्टेशनला हे टिप्पर जप्त करण्यात आले. ३ एप्रिल रोजी रात्री आगेफळ फाट्याजवळ अवैध रेती वाहतूक करत असताना टिप्पर (क्रमांक एमएच- २८-बीबी-७३८२) आढळून आले. चालकाला रॉयल्टीबाबत विचारणा केली असता त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारचा वैध परवाना आढळून आला नाही. कारवाई होईपर्यंत साखरखेर्डा पोलीस स्टेशनला सुपूर्दनामा देऊन जप्त करण्यात आले.सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या सुचनेनुसार तहसीलदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर पांग्रा मंडळ अधिकारी प्रेमानंद वानखेडे, ग्राम महसूल अधिकारी प्रभाकर बावस्कर, जे.आर. राठोड, पी.एम. पोंधे, एस.एस. पठाण यांनी ही कारवाई केली. १ एप्रिलपासून चार टिप्पर जप्त करण्यात आले. या प्रकरणी पाच ते सहा लाख रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याचे तहसीलदार अजित दिवटे यांनी सांगितले.

0 6 7 5 2 7
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

22:44