खामगाव:-तालुका प्रतिनिधी
वेगवेगळ्या ठिकाणी मधमाशांच्या हल्ल्यात ९ जण जखमी झाले.तालुक्यातील टाकळी तलाव येथील मेढे कुटुंबिय राहुड फाटा शिवारातील शेतामध्ये वास्तव्यास आहे. ४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास शेतात काम करीत असताना अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सुभद्राबाई उत्तम मेढे (५५), गजानन उत्तम मेढे (३५), आरती गजानन मेढे (३२), अर्पिता गजानन मेढे (१२), कार्तिक गजानन मेढे (५) व नीलम महादेव इंगळे (१६)। हे सहा जण जखमी झाले. त्यांना त्वरित सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. तर दुसऱ्या घटनेत तालुक्यातील हिवरा मांडका शिवारात ४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास वैभव तुकाराम अतकरे (२७), गोपाल राजाराम अतकरे (३१) व गोपाल वासुदेव बाजहे (२७) हे तिघे शेतातील झाडाखाली बसलेले असताना त्यांच्यावर मधमाशांनी अचानक हल्ला केला. त्यांनाही तातडीने सामान्य रुग्णालयात उचारार्थ भरती करण्यात आले.