कार्यालय प्रतिनिधी,- मेहकर शहरातील सुप्रसिद्ध असलेले हॉटेल पाटलाचा वाडा चे संवेदनशील व्यक्तिमत्व असलेले गजानन गारोळे यांचा वाढदिवस शहरातील युवकांनी भव्य दिव्य रक्तदान शिबिर आयोजन करून साजरा करण्यात असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. अनेक वर्षापासून व्यवसायासह समाजसेवेचा वसा घेतलेले गजानन गारोळे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. 22 फेब्रुवारी रोजी सुद्धा अशाच प्रकारच्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शहरातील शेकडो युवकांनी केले आहे.
कोविड काळात विनामूल्य घरपोच जीवनाचा डबा पोहोचण्याचे कार्य हॉटेल पाटलाचा वाडा अंतर्गत गजानन गारोळे यांनी अविरतपणे सुरू ठेवले होते. दैनंदिन शेकडो लोकांची जेवण्याची तसेच डब्बा पोहोचवण्याची व्यवस्था या काळात त्यांनी निःशुल्क पणे सुरू ठेवली. त्यांच्या या सेवेचा वसा म्हणजेच माणुसकीचे दर्शन मेहकर शहरासह जिल्ह्यातील सर्वांनाच घडले होते. याची दखल शासकीय स्तरावरून अनेक वेळा घेण्यात आली विविध ठिकाणी त्यांचा गुणगौरव सुद्धा करण्यात आला. हॉटेल व्यवसायासोबतच पत्रकारिता सुद्धा करण्यात रुची असलेले गजानन गारोळे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. मराठा आरक्षण असो मराठा मोर्चा ,तथा सामाजिक बांधिलकी ,पत्रकार क्षेत्रातील पत्रकार बांधवांना विविध स्वरूपाची मदत, हॉटेल व्यवसायात भरारी घेत अनेक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यामुळे शहरातील नामांकित व्यक्तीमध्ये त्यांचा समावेश बघावयास मिळतो. हॉटेल पाटलाचा वाडा म्हटलं की विविध व्यंजन दिवसानुरूप बघावयास, चखावयास मिळतात. त्यामुळे वर्षभर या ठिकाणी रात्रंदिवस ग्राहकांची रेलचेल वाढलेली असते. खाण्याची रुची असलेल्या ग्राहकांना चविष्ट भोजन व्हेज नॉनव्हेज पद्धतीचे या ठिकाणी शहरापासून केवळ पाचशे मीटरच्या अंतरावर बसण्याची तसेच सेवा देण्याची हमी असलेले हॉटेल पाटलाचा वाडा हे युनिट जिल्हाभर प्रसिद्धीस आले आहे.
व्यावसायिक दृष्टिकोन जोपासत असताना मित्रपरिवार वाढवून आपल्या हितचिंतकांसोबत त्यांचे वाढदिवस आपल्या प्रतिष्ठान मध्ये म्हणजेच हॉटेल पाटलाचा वाडा येथे गजानन गारोळे मोठ्या डौलाने साजरा करत असतात. त्यांच्या याच कार्याची पावती म्हणून शहरातील हजारो युवक त्यांच्या पाठीशी बघावयास मिळतात. आपल्या लाडक्या मित्राचा वाढदिवस साजरा करत असताना युवकांनी स्वतःहून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तदान हेच जीवनदान असा बहुमोलाचा सल्ला यावेळी आपल्या कृतीदर्शनांमधून देण्याचे ठरवले आहे. या रक्तदान शिबिरास शहरासह तालुक्यांमधील हजारो युवकांनी सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन यावेळी प्रा. गजानन गारोळे मित्रमंडळ • मेहकर शहर पत्रकारसंघ • शिवचंद्र मित्रमंडळ • रविभाऊ रहाटे मित्रमंडळ • सुरेशतात्या वाळूकर मित्रमंडळ • सारंग माळेकर मित्रमंडळ • हरहर कावड मित्रमंडळ माळीपेठ • क्रांतीसुर्य मित्रमंडळ माळीपेठ • बालाजी अर्बन परिवार • आर्यल अर्बन परिवार • राजर्षी शाहू अर्बन परिवार मेहकर.! यांच्या वतीने करण्यात आले आहे.