देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी
डॉ. हेडगेवार यांनी प्रत्यक्ष क्रांतिकार्यात सहभाग घेता यावा, यासाठी जाणीवपूर्वक आपले उच्चशिक्षण कोलकत्त्याला घेतले होते. तिथेच अनुशीलन समिती स्थापन करून ते क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख बनले होते. डॉ. हेडगेवार हे क्रांतिकारक कुशल संघटक व तत्वज्ञ असे व्यक्तिमत्व होते, असे प्रतिपादन भाजपा ओबीसी प्रदेशाध्यक्ष डॉ. सुनील कायंदे यांनी केले.डॉ. हेडगेवार यांची गुढीपाडव्याला म्हणजे चैत्र प्रतिपदेला देशभरात जयंती साजरी होते. त्यानिमित्त ३० मार्च रोजी स्थानिक सिविल कॉलनी येथील पाटील सभागृहात डॉ. हेडगेवार यांची जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी हिंदू नववर्ष अर्थात गुढी पाडवा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची जयंती. यानिमित्ताने त्यांच्या देदिप्यमान कारकीर्दीवर भाजपा ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील कायंदे यांनी प्रकाश टाकला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे यांनीही मनोगत व्यक्त करून त्यांच्या प्रेरणेमुळे अनेक कार्यकर्ते तयार झाले, असे सांगितले. यावेळी भाजपा ओबीसी प्रदेशाध्यक्ष डॉ. सुनील कायंदे, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष धर्मराज हनुमंते, शहराध्यक्ष संजय तिडके, निशिकांत भावसार, प्रविण धन्नावत, सविता पाटील, सुनीता सानप, ज्योती ताठे, लता पावले, प्रतिक्षा कुलकर्णी, लोकेश डोणगावकर, संजय तिडके, सुरज हनूमंते, प्रा. विनायक कुलकर्णी, प्रा. डोईफोडे, पवार ताई, संदिप गावंडे, डॉ. शंकर तलबे आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.