चिखली:-तालुका प्रतिनिधी
येथील रहिवासी अमोल उरसाल यांचा मुलगा स्वानंद उरसाल याने एनएमएसएस या स्कॉलरशिप परीक्षेत वर्धा जिल्ह्यातून प्रथम आला आहे.देशभरातील प्रत्येक राज्यात घेतली जाणारी नॅशनल मेन्स कम मेरिट स्कॉलरशिप एक्साम यामध्ये वर्धा जिल्ह्यातील एकूण १३ हजार ४५७ शाळांमधून २ लाख ४८ हजार ३१३ विद्यार्थी सहभागी झाले होते. यामधून ओपन कॅटीगीरी मधून ५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये जिल्ह्यातील प्रथम क्रमांक आर. के. विद्यालय पुलगाव येथील स्वानंद प्रिया अमोल उरसाल याने मिळविला आहे.