शेंदुर्जन:-तालुका प्रतिनिधी
येथील किंडर गार्डन प्री स्कूलमध्ये ३० मार्च रोज रविवारला गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अशोक जोशी, प्रशांत देशमुख, प्रा. जया जोशी, प्रिय फुटाणकर, निकिता शिंगणे, दिपाली फुटाणकर, पत्रकार एस.पी. शिंगणे, प्रसाद शिंगणे तसेच मोठ्या संख्येने पालक वर्ग हजर होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य जया जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच देखरेखी खाली गावामधून प्रभात फेरी सकाळी आठ वाजता काढण्यात आली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राम लक्ष्मण सीता व रावण यांचे वेशभूषा करून एक प्रकारे गुढी पाडव्याचे महत्त्व काय, याद्वारे संदेश दिल्या जात होतो. प्रभात फेरी संपल्यानंतर पालकांना व मुलांना मार्गदर्शन करताना प्रा. जोशी म्हणाल्या वर्षातील साडेतीन मुहूर्त आहे. गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा व दिवाळीचा पाडवा हा अर्धा मुहूर्त, असे एकूण वर्षातील साडेतीन मुहूर्त असतात. या मुहूर्तावर शुभ कामे केले जातात. या दिवशी रावणाचा वध करून श्रीराम वनवासातून परत आले म्हणून त्यांचे स्वागत करण्यासाठी सर्व नगरी सजवण्यात आली होती. पूर्ण नगरीमध्ये गुढ्या व तोरणाने सजवली गेली होती. असे अख्यायिकामध्ये आहे. तसेच महाराष्ट्रात महाराजांचा विजय साजरा करण्याकरता गुढी उभारण्यात आल्या होत्या आणि गुढी उभारून त्यांची विजयाची वर्जमुठ बांधली गेली, अशा शुभकार्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने पालकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती.