दाताळा:-विशेष प्रतिनिधी
मलकापूर तालुक्यातील घिर्णी येथील पत्रकार सुधाकर तायडे यांना शूरवीर जिवाजी महाले समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला असून पुणे येथील स्वराज फिल्म प्रोडक्शनद्वारा ७ एप्रिल २०२५ रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.पिंपरी चिंचवड येथील आचार्य अत्रे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. उमाताई खापरे यांच्याहस्ते होणार असून प्रमुख उपस्थितीमध्ये महेश लांडगे, आ. साबळे,प्रा. लक्ष्मण हाके, भगवान बिडवे, हिरानानी घुले, बाळासाहेब बांगर, गजानन वाशीमकर, श्रीरंग बारणे, शंकर जगताप, अण्णा बनसोडे, अमित गोरखे, अल्ताफ शेख, केशव घोळवे, राजेश दुबेवार, गणेश कराड, सागर दौलतडे आदींची उपस्थित राहणार आहे. यावेळी प्रमुख आकर्षक म्हणून अभिलेते सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने, अनिल नगरकर, सुरेश विश्वकर्मा, प्रशांत तपस्वी, तानाजी गलगुडे, भुषण कडू, प्रकाश धीडले, देव धूम्बरे, पृथ्वीराज, कार्यक्रमाचे आयोजक गिरीश राजूरकर, सागर गायकवाड उपस्थित राहणार आहे.