तिघांचे मृतदेह ओळखणंही कठीण; हेलिकॉप्टरचे अवशेष दूरवर विखुरलेले; घटनास्थळी भीषण परिस्थिती

Khozmaster
2 Min Read

पुणे: पुण्याच्या बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. सकाळी साडे सातच्या सुमारास हेलिकॉप्टर बावधनमधील डोंगराळ भागात कोसळलं. या अपघातात दोन पायलटसह तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. ऑगस्ट महिन्यातच हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली होती. यानंतर आता जवळपास दीड महिन्यात पुन्हा हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे हवाई वाहतुकीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.पुण्याच्या बावधनमध्ये सकाळी साडे सात वाजता हेलिकॉप्टर कोसळलं. धुक्यामुळे हा अपघात घडला असण्याची शक्यता पोलीस सहआयुक्तांनी वर्तवली आहे. हिंजवडी पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलेलं आहे. हेलिकॉप्टरमधील तिघांचा मृत्यू झालेला आहे. हेलिकॉप्टरमधील आग अद्याप धुमसतेच आहे. घटनास्थळी भीषण परिस्थिती आहे.धुक्याचा अंदाज न आल्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर हेलिकॉप्टरनं पेट घेतला. या अपघातात तिघांना प्राण गमवावे लागले. त्यात दोन पायलट आणि एका इंजिनीअरचा समावेश आहे. तिघांचे मृतदेह ओळखताही येत नाहीएत. ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन हेलिकॉप्टरनं सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास उड्डाण केलं होतं. काही अंतर कापल्यानंतरच हेलिकॉप्टरला अपघात झाला. दिल्लीतल्या हेरिटेज कंपनीच्या मालकीचं असलेलं हेलिकॉप्टर ऑगस्टा बनावटीचं होतं.हेलिकॉप्टर कोसळताच त्याचे अक्षरश: तुकडे झाले. ते परिसरात बराच अंतरावर पडलेले दिसत आहेत. हेलिकॉप्टर कोसळलं, त्या ठिकाणापासून बऱ्याच अंतरापर्यंत हेलिकॉप्टरचे तुकडे पडलेले दिसत आहेत. त्यावरुन अपघाताची तीव्रता स्पष्ट होत आहे. ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्ट आणि एचईएमआरएल ही केंद्र सरकारची संस्थेच्या दरम्यान असलेल्या डोंगराळ भागात हेलिकॉप्टरला अपघात झाला.हेरिटेज कंपनीचं हेलिकॉप्टर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरेंना घेण्यासाठी निघालं होतं. तटकरे सध्या मुंबईत आहेत. त्यांना रायगडला जायचं आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर पुण्याहून मुंबईला जात होतं. तिथून ते तटकरेंना घेऊन रायगडसाठी उड्डाण करणार होतं. मात्र उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांत हेलिकॉप्टरला अपघात झाला. तटकरे सुदैवी ठरले असले, तरीही या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.

0 6 7 4 9 3
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16:08