सतीश पाटील तेजनकर
लोणार :-
राज्यातील सर्व विभागांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना प्रथम तीन वर्षे त्यांना अत्यंत कमी मानधनावर कार्य करावे लागते.हे कार्य ते पूर्ण क्षमतेने पार पाडतात किंबहुना ते चतुर्थ श्रेणी कर्मचारी असल्यामुळे त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीपेक्षा जास्तीचच काम त्यांना करावे लागते.म्हणून या लोकांना योग्य न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.भागवत तेजनकर यांनी मा.मुख्यमंत्री,शालेय शिक्षण व क्रीडामंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की चतुर्थ श्रेणी कर्मचारी नियुक्त करताना विशेषतः शिक्षण विभागामध्ये त्यांना प्रथम तीन वर्षाचा कार्यकाळ हा सेवाकाळ गृहीत धरला जातो.या कालखंडात हे कर्मचारी पूर्ण क्षमतेने किंबहुना जबाबदारी पेक्षा जास्त काम करत असतात.परंतु त्यांना मिळणार मानधन हे अतिशय तुटपुंज आहे.रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांपेक्षा निम्म्याहून कमी आहे.त्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी.व धोरणात्मक निर्णय घ्यावा.कुठलेही चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे मानधन हे रोजगार हमीवर जाणाऱ्या मजुरी पेक्षा कमी नसावे.अशी विनंती डॉ.भागवत तेजनकर यांनी मुख्यमंत्री कार्यालयात मेलद्वारे केली आहे.
तसेच या मागणीसाठी फोनवर त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे सोबत चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली.व सोबतच सेंट्रल बँकेमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी सिबिल स्कोर कमी असल्यामुळे येत असलेल्या अडचणी बाबत माहिती दिली.याबाबत मा.मुख्यमंत्र्यांसोबत बोलून लवकरच प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले असल्याचे डॉक्टर भागवत तेजनकर यांनी सांगितले.