अजितदादांच्या आठवणींनी सिंदखेडराजा गहिवरला विदर्भात सर्वाधिक भेट दिलेले शहर; जिजाऊंच्या चरणी अखंड श्रद्धा
अखंड श्रद्धा सिंदखेड राजा प्रतिनिधी : राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेडराजा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे एक अतूट भावनिक नाते होते. विदर्भातील इतर कोणत्याही शहराच्या तुलनेत अजितदादांनी…
आठ दिवसांत दुचाकी चोरीचा पर्दाफाश धाड पोलिसांची दमदार कामगिरी; रुईखेड येथील चोरटा जेरबंद
धाड प्रतिनिधी : स्थानिक राजे संभाजी चौक परिसरातील एका घरासमोरून चोरीस गेलेल्या दुचाकी प्रकरणाचा अवघ्या आठ दिवसांत छडा लावण्यात धाड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात चोरट्यास अटक करण्यात आली…
मराठा समाजासाठी न्यायालयाऐवजी संवादाचा नवा मार्ग मराठा पंचायत समितीची स्थापना – छत्रपती शिवराय प्रतिष्ठानचा पुढाकार
मलकापूर प्रतिनिधी : लग्नानंतर पती-पत्नीमध्ये उद्भवणारे वाद थेट न्यायालयात न नेता संवाद, समजूत आणि समुपदेशनाच्या माध्यमातून मिटवता यावेत, या सामाजिक उद्देशाने मलकापूर येथील छत्रपती शिवराय प्रतिष्ठान आणि अकोट येथील संत…
तरुणावर लोखंडी अवजाराने हल्ला जिमखाली बोलावून डोक्यात मारहाण; आरोपीविरोधात गुन्हा दाखल
खामगाव प्रतिनिधी : शहरातील पंचायत समितीसमोर असलेल्या जिमखाली एका तरुणाला बोलावून त्याच्यावर लोखंडी अवजाराने हल्ला केल्याची घटना मंगळवार, २८ जानेवारी रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी वैष्णव राजेश…
कोरोना भत्त्यासाठी आशा वर्कर्सचे आंदोलन थकीत २३ महिन्यांचा भत्ता त्वरित द्यावा – अन्यथा १२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
देऊळगाव राजा प्रतिनिधी : गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला २३ महिन्यांचा कोरोना भत्ता त्वरित देण्यात यावा, या मागणीसाठी आशा वर्कर्स, अर्धवेळ स्त्री परिचारिका तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आज…
अंढेरा येथे कडकडीत बंद पाळून अजितदादा पवारांना श्रद्धांजली
अंढेरा प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाच्या पार्श्वभूमीवर अंढेरा येथे सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी, युवक व ग्रामस्थांच्या वतीने स्वयंस्फूर्त कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद…
आयुष क्षेत्राची डिजिटल झेप!
देशभरात आयुष औषधे व आरोग्य उत्पादने सहज, जलद आणि विश्वासार्ह पद्धतीने पोहोचवण्यासाठी आज ‘आयुषएक्सिल (AYUSHEXCIL)’ आणि ‘झेप्टो (Zepto)’ यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार करण्यात आला. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी…
महिलेच्या पोटातून काढला सहा किलोचा मांसाचा गोळा जिल्हा महिला रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
बुलढाणा प्रतिनिधी : येथील जिल्हा महिला रुग्णालय गोरगरीब महिलांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत असून, येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने पुन्हा एकदा वैद्यकीय कौशल्य सिद्ध केले आहे. आज (दि. २९) एका महिलेच्या…
संग्रामपूर तालुक्यातही कडकडीत बंद ठेवून अजितदादांना श्रद्धांजली
संग्रामपूर प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून संग्रामपूर तालुक्यातही याचे तीव्र पडसाद उमटले. तालुक्यातील संग्रामपूर, पातुर्डा, वरवट बकाल व वानखेड येथे सर्वपक्षीयांच्या वतीने…
बुलढाणा जिल्ह्यात शोककळा ; अजितदादा पवार यांच्या निधनाने सर्वत्र श्रद्धांजली
बुलढाणा प्रतिनिधी : विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे झालेल्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. २८ व २९ जानेवारी रोजी जिल्हाभर विविध ठिकाणी श्रद्धांजली सभा, बंद…
