औरंगाबाद पोलीस आयुक्तांची विशेष पथकाची धडाकेबाज कामगिरी
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत (खोजमास्तर न्यूज)महाराष्ट्र
उस्मानपुरा,औरंगाबाद-येथील पाच वर्षांपासून खुनाच्या आरोपात फरार असलेला आरोपी वाळूज च्या इंड्यूरन्स कंपनीत काम करत असताना उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाने पकडला
प्रवीण उत्तम वाकळे (३५ अंदाजे) रा, सेनगाव, हिंगोली असे अटक आरोपीचे नाव आहे पाच वर्षांपूर्वी आरोपी वाकळे हा संदीप प्रभाकर जोशी रा. गादिया विहार यांच्या गोडावूनवर सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता २०१७ साली १० जुलै रोजी काही चोरटे त्या ठिकाणी चोरी करण्यासाठी गोडाऊनवर दगडफेक करत होते म्हणून आरोपी वाकळे याने मालक संदीप जोशी यांना गोडाऊनवर बोलावून घेतले त्या ठिकाणी विजय सदाफुल नावाचा चोरटा जोशी आणि वाकळे यांनी पकडला त्याला बेदम मारहाण केली या प्रकरणात उस्मानपुरा पोलीस ठाण्यात ३२६ कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळेस आरोपी संदीप जोशी ने अटकपूर्व जामीन मिळवला होता व वाकळे पळून गेला होता दोन दिवसांनी मारहाण करण्यात आलेला चोरटा सदाफुल हा उपचारा दरम्यान मरण पावला. त्यानंतर उस्मानपुरा पोलिसांनी गुन्ह्यात आरोपपत्रही दाखल झाले केले होते. यागुन्ह्यात एपीआय राहुल सूर्यतळ यांना हिंगोली पोलिसांनी खबर दिली की, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी वाकळे हा औरंगाबाद येथील वाळूज औद्योगिक परिसरातील इंड्यूरन्स कंपनीत काम करतो. गेल्या चार दिवसांपासून एपीआय सूर्यतळ यांनी त्याच्यावर पाळत ठेवत आज प्रवीण वाकळे ला अटक केली
दरम्यान एक महिन्यापूर्वी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात एका विशेष पथकाची नेमणूक केली आहे. हे पथक जुन्या गुन्ह्यातील फरार आरोपी शोधण्याची कामगिरी करते, या पथकात एक अधिकारी चार कर्मचारी असतात. या पथकावर गुन्हेशाखा पोलीस निरीक्षक अविनाश आघाव देखरेख करतात प्रत्येक आठवड्यात सोमवारी या पथका कडून टार्गेट घेतले जाते त्यानुसार उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या पथकाने वरील कामगिरी पार पाडली.
या कारवाईत पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता , पोलीसउपायुक्त दीपक गिर्हे, सहाय्य्क पोलीस आयुक्त विशाल ढुमे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, गीता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहुल सूर्यतळ पोलीस कर्मचारी योगेश गुप्ता, सतीश जाधव , संदीप धर्मे यांनी सहभाग घेतला होता