आदर्श विद्यालय चिखली येथे गणित दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला

Khozmaster
2 Min Read

आदर्श विद्यालय चिखली येथे गणित दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला ज्येष्ठ वैज्ञानिक गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त संपूर्ण भारत भारतामध्ये  गणित दिन म्हणून साजरा केला जातो या दिनानिमित्त आदर्श विद्यालय चिखली या ठिकाणी गणिती साहित्याचे प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले व तसेच गणिती गणित सूत्रे आकार भाषिक रांगोळीचे प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले यामधून विद्यार्थ्यांनी गणिताचे मॉडल असणाऱ्या आपल्या कलागुणांच्या माध्यमातून सादरीकरण केले स्क्वेअर अंकगणित भागाकार गुणाकार त्रिकोण काटकोन याचे थ्री  डायमेन्शन मॉडेल तयार करण्यात आले या गणित ग्रंथ तसेच गणिती मॉडेल प्रदर्शनीचे उद्घाटन माननीय प्राचार्य समाधान शेळके सर ज्येष्ठ शिक्षक श्री आर एस कुटे सर उपमुख्याध्यापक श्री प्रमोद ठोंबरे सर पर्यवेक्षक श्री गणेश नालींदे  सर तसेच गणित शिक्षक सुनील तायडे सर यांच्या उपस्थितीमध्ये प्रदर्शनीचे उद्घाटन झाले व दुपार सत्रमध्ये  गणित दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय प्राचार्य श्री समाधान शेळके सगळ्यांनी भूषवले तर प्रमुख मार्गदर्शन उपप्राचार्य श्री प्रमोद ठोंबरे सर यांनी केले आपल्या भाषणामध्ये गणित हा विषय निसर्गामध्ये कशाप्रकारे मिसळलेला आहे फुल पान झाडांची उंची त्याबरोबर बियांचा आकार याचे समतोल गणितीय समीकरणासारखे असतात याचे उदाहरण विद्यार्थ्यांना समजून सांगितले त्याचबरोबर अध्यक्ष भाषणामध्ये  प्राचार्य श्री समाधान  शेळके सर यांनी गणित दिनाच्या शुभेच्छा देत गणिताला  किती महत्त्व आहे हे विचार व्यक्त केले या गणित दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी गीताच्या माध्यमातून तसेच भाषणाच्या माध्यमातून गणित दिनाचे महत्त्व स्पष्ट केले या त्याचबरोबर आदर्श विद्यालय येथील कलाशिक्षक श्री गणेश अंभोरे सर यांनी फलकावर श्रीनिवास रामानंद यांची चित्र काढून गणित दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी मंचावर  पर्यवेक्षक श्री आर एस कुटे सर पर्यवेक्षक श्री गणेश नालींदे सर ज्येष्ठ शिक्षक श्री श्रीपाद दंडे सर श्री सुनील तायडे सर विकास जाधव सर उपस्थित होते या गणित दिनाच्या नियोजनासाठी विशाल कुरकुटे सर, निलेश भारोडकर सर, वैभव शिंगणे सर, अस्विनी पवार मॅडम, विकास जाधव सर यांनी मोलाचे सहकार्य केले

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *