(नेवासा प्रतिनिधी :- लखन वाल्हेकर)
नेवासा पाटबंधारे विभागाकडून मुकिंदपुर हद्दीतील काही ठिकाणचे अतिक्रमण काढण्याला तीव्र विरोध करत व्यापाऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून व्यापाऱ्यांना त्रास दिल्यास येत्या आठवडाभरात अहमदनगर येथे कार्यकारी अभियंता यांच्या दालनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संभाजी माळवदे यांनी दिला.
सविस्तर वृत्त असे की, मुकिंदपुर हद्दीतून डीवाय तींनची मायनर दोन ही शाखा पावन गणपती पर्यंत जाते या शाखेद्वारे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळते, परंतु लाभक्षेत्र कमी झाल्याने मायनर दोन ही पूर्णपणे बंद झाली, याला बंद होवून पंधरा वर्षाचा कालावधी उलटला यावर नेवासा फाटा परिसरात अनेक व्यापाऱ्यांनी बांधकाम करुण व्यापार सुरु केला आहे. सध्या पाटबंधारे विभागाकडून ही अतिक्रमणे हटविली जाण्यासाठी नोटीसा दिल्या. परंतू अतिक्रमणाची ही मोहीम काही गटापूरती मर्यादित असल्याने यामागे संशय व्यक्त केला जात आहे. पाटबंधारे विभागाची भूमिका ही संशयास्पद असल्याची चर्चा सुरू असून अतिक्रमणं काढायचे तर पूर्णच काढा अन्यथा मोजकी अतिक्रमणे काढू देणारं नाही ही भूमिका सर्व व्यापाऱ्याची आहे. यावेळी संभाजी माळवदे यांनी पाटचारी बंद होवून वीस वर्षे उलटली आणि आज पाटबंधारे विभागाला अतिक्रमण काढण्याची जाग आली तेही एका गटापुरतेच गाळेधारकांना नोटीसा दिल्या. हा व्यापऱ्यावरील अन्याय्य असुन तो कदापी सहन करणार नाही. आम्ही व्यापाऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहू कोणत्याही परिस्थितीत व्यापाऱ्यावरील अन्याय्य सहन करणार नाही व एकाही गाळ्याला हात लावू देणारं नाही.वेळ प्रसंगी कुठलीही तमा न बाळगता रस्त्यावर उतरू,असे स्पष्ट केले. चर्चेच्या वेळी रावसाहेब घुमरे, अयान पिंजारी, शाहरुख कुरैशी, सुलेमान शेख, आरिफ पठाण, गोकुळ सोनवणे, इरफान पटेल, भैय्या पटेल, संतोष ससाणे, विकास गवली, अशोक वाघ, कैलाश कोकणे, सचिन गायकवाड, अश्फाक शेख, सुरेश चव्हाण, हरीभाऊ दुकळे आदीसह व्यापारी उपस्थित होते.यावेळी उपअभियंता अक्षय कराळे यांना अतिक्रमण बाबत निवेदन देण्यात आले.
*चौकट* – अतिक्रमण काढण्यास आमचा विरोध नाही पण अतिक्रमण हे पूर्णपणे काढण्यात यावे. मोजकी अतिक्रमणे काढण्यास आमचा तीव्र विरोध आहे. हा काही व्यापाऱ्यावर अन्याय करणारा आहे. पाटबंधारे विभागाला सांगणारा व फुस देणारा नेमका कोण सूत्रधार आहे ज्याचे ऐकून ही अन्यायी कारवाई करण्याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या याचा खुलासा होणे गरजेचे आहे – अंजुम पटेल, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी