विधानसभा क्षेत्रामध्ये विविध पक्षांचे कार्यकर्ते व नेते कामाला लागले आहेत. क्षेत्रामध्ये भेट देणे तर ठिक ठिकाणी बॅनर बाजी करणे सुरू आहे.त्याच प्रमाणे साकोली विधानसभा क्षेत्रात सुध्दा विविध पक्षांचे नेते आप-आपल्या पक्षाच्या माध्यमातून कामाला लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
याच साकोली विधानसभा क्षेत्रामधुन शिवसेना शिंदे गट पक्षाचे देवचंद अन्नाजी कावळे हे उमेदवार म्हणून लढत असल्याचे कावळे यांनी सांगितले.
देवचंद कावळे हे गेल्या 20 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करित असल्याचे सांगितले, सामाजिक क्षेत्रात काम करित असताना त्यांनी गेल्या 15 वर्षांपासून राजकिय पक्षात राहून सामाजिक क्षेत्रात कामाला जास्त भर दिला असल्याचे कावळे यांनी सांगितले.
देवचंद कावळे यांनी सांगितले की,मी गेल्या 15 वर्षांपासून राजकिय क्षेत्रात जुळलो असता गेल्या दहा वर्षांपासून शिवसेना पक्षात काम करीत असुन हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार मनात ठेवून मी 80 टक्के समाजकारण तर 20 टक्के राजकारण या विचाराने काम करित आहे. मी सामाजिक क्षेत्रामंध्ये काम करीत असताना मला गेल्या पाच वर्षांअगोदर क्षेत्रातील जनता मला म्हणायची की, कावळे साहेब तुम्ही विधानसभा लढायला पाहिजे, तुमच्या सारखे निष्ठावंत कार्यकर्ते व समाजासाठी काम करणाऱ्या माणसाची गरज आहे. परंतु मी त्यावेळी विधानसभेला समोर न येता जनतेमध्ये निष्काम भावनेने निष्ठावंत पणे काम करीत राहिलो आणि अजुन पर्यंत मी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता साकोली विधानसभा क्षेत्रात काम करित आहे. मी शिवसेना पक्षात काम करीत असताना सन 2021/22 मध्ये शिवसेना पक्षाचे दोन गट झाले.त्यावेळी मी शिंदे गटात गेलो तेव्हा मला लाखांदूर तालुका प्रमुख पद देण्यात आले आणि तेव्हा पासून मी लाखांदूर तालुक्यातील नाही तर संपूर्ण साकोली विधानसभा क्षेत्रात जोमाने कामाला सुरुवात केली पक्ष कसा वाढेल हा विचार मनात घेवून मी अहोरात्र मेहनत घेतली आणि आज मी लाखांदूर तालुक्यात नाही तर संपूर्ण साकोली विधानसभा क्षेत्रात प्रत्येक गावा-गावात शिवसेना पक्षाचा प्रचार व प्रसार करीत आहो. प्रसार करीत असतांना शासनाच्या योजनाचा सुध्दा प्रचार व प्रसार केला.ज्या गावा पर्यंत शासनाच्या योजना पोहचल्या नाही तिथे मी व माझे कार्यकर्त्याच्या माध्यमतुन जवळपास क्षेत्रातील सर्वच गावात योजना विषयी माहीती दिली असे कावळे यांनी सांगितले.
कावळे म्हणाले की, मी क्षेत्रात फिरत असताना मला क्षेत्रात पाहिजे त्या प्रमाणात विकासा झाल्याचे दिसून येत नाही. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून सत्तेवर असलेले मोठ-मोठे नेते आहेत परंतु यांनी आपल्या क्षेत्रासाठी काय केले यावर जनता प्रश्नचीन्ह निर्माण करीत आहे.
या क्षेत्रातील नेत्यांनी फक्त आणि फक्त
स्वतः चा विकास केला ॽ हा खुप मोठा प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे..आज आपल्या क्षेत्रात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतमजूराचे प्रश्न आहेत, क्षेत्रात बेरोजगारांसाठी रोजगार नाही,तर आपल्या ओबीसी मुला-मुलींना क्षेत्रात शासकीय वसतिगृह नाही. असे काही गावे आहेत कि त्या गावात जायला बरोबर रस्ते नाही काही गावांमध्ये तर पिण्याच्या पाण्याची समस्या आहे.आज आपल्या क्षेत्राच्या सभोवताल इटिया डोह , नवेगाव बांध,गोसे धरण सारखे मोठ मोठे प्रकल्प असताना सुद्धा शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही.येवढेच नाही तर काही गावांमध्ये केंद्र सरकार व राज्य शासनाच्या योजना जनतेला सांगितले जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे म्हणजे हि किती दुर्दैवी बाब आहे. यावरुन असे लक्षात येते की, या क्षेत्रात जे स्वतः ला लोकनेते म्हणवुन घेतात त्यांनी क्षेत्राचा कोणता सर्वांगीण विकास केला हा प्रश्न निर्माण होत आहे..एवढ मात्र खर की, या नेत्यांनी स्वतः चा विकास मात्र चांगल्या पद्धतीने करून घेतला. यांनी फक्त मोठे श्रीमंत लोकांनाच मदत केल्याचे दिसुन येते. एक म्हण आहे. नेता तुपाशी व जनता उपाशी…
मी क्षेत्रात सामाजिक स्तरावर कामं करीत असताना मला नेहमी जनता म्हणायची कावळे साहेब तुम्ही विधानसभा लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशाप्रकारे मला नेहमी म्हणायचे तेंव्हा मी स्वतः आपल्या मणात खुप विचार केला आणि क्षेत्रात फिरत असताना मला जो खोटा विकास दिसून आला त्यावर मी ठरवल की, शासनाच्या निधीचा वापर क्षेत्राच्या विकासा करीता होतो की पुन्हा कुठल्या बाबीवर खर्च होतो. आज क्षेत्रातील जनतेचा आवाज आणि मिळत असलेला सहकार्य यांचा विचार केला आणि समोर मी आलो.व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत साकोली विधानसभा लढायचे असे ठरविले.आणि मी व माझे निष्ठावान सहकारी व पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन त्यांची साकोली येथे बैठक घेतली त्या बैठकीत देवचंद अन्नाजी कावळे हे शिवसेना पक्षामधुन साकोली विधानसभा लढणार असा ठराव घेण्यात आला.आणि झालेल्या ठरावाची प्रत व माझा उमेदवारी अर्ज पक्षश्रेष्ठी कडे मुंबई येथे दाखल केला आणि मी जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने साकोली विधानसभा क्षेत्रात जोमाणे कामाला लागलो असे देवचंद कावळे यांनी सांगितले.
कावळे म्हणाले मी क्षेत्रात केलेल्या कामाची दखल पक्ष नक्की घेणार
आणि मला साकोली विधानसभा क्षेत्रात शिवसेना पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणुक लढण्याची संधी नक्की देणार असा ठाम विश्वास मुंबई वरुन आल्या नंतर श्री कावळे यांनी सांगीतले
आणि येणारी साकोली विधानसभा निवडणूक आम्हीच प्रचंड बहुमताने जीकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याच कारण असे सांगीतले की, मी क्षेत्रात निष्ठावंत निष्काम भावनेने केलेले काम आणि जनतेचा आशिर्वाद हा नेहमीच माझ्या सोबत आहे. असे देवचंद भाऊ कावळे यांनी सांगितले.
आणि जनतेमधून साकोली विधानसभा क्षेत्रात शिवसेना पक्षाचे देवचंद भाऊ कावळे यांच्या नावाची जोरदार चर्चा असल्याचे दिसून येत आहे.
त्याच्या पुढील वाटचाली करीता शुभेच्छा..