औरंगाबाद, प्रतिनिधी ;गोकुळसिंग राजपूत
पुणे येथील पिंपरी चिंचवड (चिखली) शहरांमध्ये मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमासाठी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, आय आय बी एम कॉलेज चिखली,पुणे या संस्थेमध्ये आज जीके-सीईटी ची परीक्षा घेण्यात आली.
आजच्या सीईटी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मॅनेजमेंट 11वी या अभ्यासक्रमासाठी शासकीय कोट्यातून निवड झाली आहे.
सदर आय आय बी एम संस्था पुणे विद्यापीठ महाराष्ट्र बोर्ड भारत सरकार व यु जी सी विद्यापीठ मान्यताप्राप्त आहे. या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचे दहावी पास नंतर 11 वी 12 वी मॅनेजमेंट शिक्षण पूर्ण होते.तसेच विमान व्यवस्थापन,जहाज व्यवस्थापन, हॉटेल मॅनेजमेंट,ट्रॅव्हल्स अँड टुरिझम,बिझनेस मॅनेजमेंट,इव्हेंट मॅनेजमेंट अशा विविध ठिकाणी 100% खात्रीशीर नोकरीची संधी भारतात व परदेशात देण्यात येते.
पुणे जिल्ह्यातील निगडी येथील श्री स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यामंदिरची विध्यार्थिनी अंजली विजय शेरेकर हिने आज झालेल्या जीके-सीईटी परीक्षेत घवघवीत यश मिळवले. त्यामुळे या विद्यार्थिनीचे परीक्षा विभागातून डोनेशन माफ झाले आहे.अंजली विजय शेरेकर या विद्यार्थिनीची परीक्षा विभागातूनच निवड झाली असून शासन नियमानुसार तिला डोनेशन भरावे लागणार नाही.
इयत्ता 10 वीत शिकणारी अंजली विजय शेरेकर ही अत्यंत हुशार विद्यार्थिनी असून अभ्यासासोबतच डान्सची देखील तिला आवड आहे.त्याचबरोबर वयाच्या अकराव्या वर्षापासून शाहीर चैतन्य काजोलकर त्यांच्याकडे ती पोवाड्याचे शिक्षण घेत आहे. उत्तम पोवाडा गायकीमुळे तिला आतापर्यंत तीन बालशाहीर पुरस्कार देखील मिळाले आहेत.
आज झालेल्या जीके-सीईटी परीक्षेमध्ये तिने 60 पैकी 43 मार्क्स घेतले आहेत.त्याबद्दल तिच्या कुटुंबातूनच नव्हे तर पूर्ण शाळेतून तसेच पिंपरी – चिंचवड आणि निगडीमध्ये देखील तिचे कौतुक होत आहे.