सोयगांव शहरात येथे सेवा पंधरवाडा कार्यक्रम अंतर्गत कार्यक्रम सोयगाव कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ०२/१०/२०२२ रोजी महाडीबीटी,कृषी यांत्रिकीकरण, रब्बी हरभरा बियाणे व ज्वारी प्रकल्प, ई पीक व पी.एम.किसान योजनेची माहिती एम.आर.पाटील कृषी सहाय्यक, पी.ए.पाटील कृषी सहाय्यक जरंडी, व्ही.डी.तायडे आमखेडा,एम.पी.बारी सोयगाव यांनी सोयगाव येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विविध पिकातील किड व रोग नियंत्रण याविषयीची माहिती कृषी सहायक हेमंत देशमुख
सोयगाव यांनी फळबागेतील किड व रोग तसेच विविध उपाययोजना याविषयीची माहिती दिली,तर तालुका कृषि अधिकारी एस.जी.वाघ कापूस मुल्यसाखळी प्रकल्प याविषयी माहिती दिली, कृषि मानसिंग भोळे यांनी रब्बीची लागवड व ठिबक सिंचन योजना याविषयी माहिती दिली,
यांनी शेतकरी गट संघटन व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना याविषयी माहिती दिली, कृषि सहाय्यक ए.एस.बावस्कर यांनी महाडीबीटी योजना, विविध प्रकारचे सापळे वापरणे याविषयी माहिती दिली.यावेळी सोयगाव कृषी विभागाचे कर्मचारी, अधिकारी, शेतकरी, पत्रकार बंधू, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.