औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत येथील कर्णपुरा यात्रेमध्ये नवरात्र उत्सव व तुळजा मातेच्या देवीच्या दर्शनासाठी भक्त भाविकांची दररोज लाखो च्या संख्येने हजेरी , पोलीस आयुक्त श्री डाॅ निखील गुप्ता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्वच सन्माननीय पोलीस अधिकारी व सहकारी सर्वांचेच मोलाचे योगदान आहेच , तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दर्शन रांगे साठी ही व जत्रेमधे , वेशभूषा बदलुन ही अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची करडी नजर ठेवून मोबाईल चोरी, पाकेटमार, करणाऱ्यांना संशर्ईतांना ताब्यात घेत आहेत,मणी मंगळसुत्र,नेकलेस ,मोल्यवान , गळ्यातील चैन , गर्दीच्या फायद्यात धक्का बुक्की ,लोटालाठी करुन कळत न कळत ,आपली नजर चुकवुन ,चोरी करण्याचा प्रयत्न केला जातो , छेडछाडीच्या घटना या साठी पण दामिनी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे,या रणरागीणी पण सिव्हील डेस मधे गर्दी मधे कर्तव्य बजावत आहेत पोलीस व प्रशासन आपली चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे सर्व भाविक भक्त यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने नम्र विनंती करण्यात येत आहे की सर्व जबाबदारी पोलिसांवर सोडुन चालणार नाही , दर्शनसाठी व जत्रे साठी येणाऱ्या प्रत्यकानी ,आपले खिसे पाकिट मोबाईल सांभाळावे,महीलांनी आपल्या मोल्यवान वस्तुची काळजी घ्यावी,अशे आवाहन औरंगाबाद पोलीस प्रशासनाने केले आहे.महीला व पुरुष यांची दर्शनासाठी वेळ वेगवेगळ्या लाईन असल्याने ,नवरा – बायको ,पती पत्नी ,जेष्ठ नागरिक,लहान ,मोठी मुलं यांची हुक चुक होती आहे ,त्यांच्याही नावाची अलाऊन्सींग करण्याची ही जबाबदारी पोलीस प्रशासन निभावत आहे तरीही सर्वांना पोलीस प्रशासन नम्र विनंती करत आहे. गर्दित गडबड करणारे, संशर्ईतांची माहीती आपल्या आजुबाजूला कार्यरत असलेले पोलीस ,महीला व पुरुष यांच्या नजरेत आणुन देण्यासाठी सहकार्य करावे व वरील अनेक सुचनांचे पालन करुन पोलीसांचा जास्तीचा होणारा त्रास थोडाफार कमी होण्यास मदत होईल अशी माहिती दैनिक भास्कर – मच्छिंद्र नागरे यांनी उपसंपादक गोकुळसिंग राजपूत याच्याशी बोलताना सांगितले