औरंगाबाद,पोलीस ठाणे शिल्लेगाव हद्यीतील पिंपळगाव दिवशी शिवारातील दगडा फार्म हाऊस येथील जुगाराचा अड्डावर पोलिसांचा छापा

Khozmaster
3 Min Read

औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत गुन्हे शाखेकडुन उध्वस्त … सात आरोपींच्या ताब्यातुन 1,81,12,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त … औरंगाबाद,मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण यांना गोपनीय बातमीदारा मार्फत शिल्लेगाव हद्यीतील दगडा फार्म हाऊस येथे अवैधरित्या जुगार अड्डा चालु असल्याची माहिती मिळाली यावरून मा. पोलीस अधीक्षक यांनी स्थागुशा पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, व त्यांचे पथकाला तात्काळ मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी खात्री करून छापा मारण्याचे सुचना देऊन रवाना केले. यावरुन श्री. प्रकाश बेले, उपविभागीय पोलीस अधिकारी,व स्थागुशा चे पथकांने कसाबखेडा फाटा ते देवगाव रंगारी जाणारे रोडवर मनोजकुमार दगडा यांचे दिवशी शिवारातील शेतातील फार्म हाऊसवर पडताळणी केली असता तेथे काही ईसम हे स्वत:चे आथिर्क फायदयासाठी पत्यावर रुपये लावुन झन्ना- मन्ना नावाचा जुगार खेळ खेळत व खेळवित असल्याचे समजले यावरुन पंचासमक्ष रात्री 03:30 वाजता मनोजकुमार दगडा यांचे दिवशी ता. गंगापुर शिवारातील फॉर्म हाऊस येथे अचानक छापा टाकला असता तेथील पहिल्या मजल्याच्या गॅलरीमध्ये झन्ना -मन्ना जुगार खेळणा-या ईसमाना ताब्यात व विश्वसात घेऊन त्यांचे नाव गाव विचारता ती पुढील प्रमाणे सांगितली आहे.1) पुनमसिंग सुनील ठाकुर वय 33 वर्ष रा. रांजणगाव शेणपंुंजी ता.जि. औरंगाबाद,2) गणेश रावसाहेब पोटे वय 28 वर्ष रा.नागेश्वरवाडी, औरंगाबाद 3) कुणाल दिलीपकुमार बाकलीवाल वय 37 वर्ष रा. शहागंज, औरंगाबाद 4) अभिषेक वसंतकुमार गांधी वय 36 वर्ष रा.चिकलठाणा औरंगाबाद 5) संदीप सुधीर लिंगायत वय 47 वर्ष रा. बन्सीलाल नगर औरंगाबाद6) विशाल सुरेश परदेशी वय 33 वर्ष रा पदमपुरा, औरंगाबाद 7) मनोजकुमार फुलचंद दगडा वय 46 वर्ष रा. सिडको एन-9 छायानगर, औरंगाबाद असे मिळुन आले आहेत.त्याचे ताब्यातुन 25,60,000/- रुपये रोख तसेच पाच वाहने चारचाकी, मोबाईल हॅन्डसेट 07, जुगाराचे साहित्य असा एकुण 1,81,12,000/- ( एक कोटी, ऐक्यंशी लाख बारा हजार रूपये मात्र) किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  नमुद आरोपीविरुध्द पोलीस ठाणे शिल्लेगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस ठाणे शिल्लेगाव हे करित आहेत.नमुद कारवाई ही मा.मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. प्रकाश बेले, उपविभागीय पोलीस अधिकारी, गंगापुर, स्थागुशा चे पोनि रामेश्वर रेंगे, पो.उप.नि. प्रदीप ठुबे, पोलीस अंमलदार लहु थोटे, श्रीमंत भालेराव, किरण गोरे, गणेश गांगवे, विजय धुमाळ, उमेश बकले, ज्ञानेश्वर मेटे, आनंद घाटेश्वर यांनी केली आहे.अशी माहिती मा.मनिष कलवानिया पोलीस अधीक्षक यांनी खोजमास्तर चे प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत याच्याशी बोलताना सांगितले.

 

0 6 7 7 6 9
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

05:25