औरंगाबाद/ प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत औरंगाबाद येथील कर्णपुरा येथील दसरा अर्थात विजयादशमी निमित्त बुधवारी सायंकाळी कर्णपुरा येथील देवीच्या मंदिरापासून पंचवटी चौकाकडे निघालेल्या भगवान बालाजींच्या रथाने लाखो भाविकांचे लक्ष वेधले, ही रथ काढण्याची परंपरा साडेतीनशे वर्षांची आहे. कर्णपुरा येथील हे बालाजी मंदिर साडेतीनशे वर्षापासून आहे येथे दरवर्षी दहा दिवस उत्सव नवरात्र उत्सव चालतो आणि दसऱ्याच्या दिवशी बालाजीची उत्सव साजरा करण्यात येतो.यंदाही बुधवारी श्री बालाजीची मूर्ती रथामध्ये बसून पंचवटी चौकातील नवीन पुलापर्यंत रथ आणण्यात आला, दरम्यान विठ्ठल मंदिरात मानाची आरती करण्यात आली. सायंकाळी निघालेला रथ परत रात्री दहा वाजता बालाजी मंदिरात आल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत आरती आणि सवाष्णींकडून औक्षण करण्यात आले, अशी माहिती संजय पुजारी अभय पुजारी, जयवंत पुजारी, अनिल पुजारी, गोपाल कृष्ण पुजारी, दिवाकर पुजारी आदींनी दै.खोजमास्तर न्यूजचे प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत याच्याशी बोलताना सांगितले.