धाराशिव येथे हिरकणी महोत्सव व प्रदर्शनास नुकतीच सदिच्छा भेट दिली. महिलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी व त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कित्येक वर्षापासून लेडीज क्लबच्या माध्यमातून ‘हिरकणी महोत्सव’ आयोजित केला जात आहे. लेडीज क्लबच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा मा. अर्चनाताई पाटील या जिल्ह्यातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय सुरू करण्यासाठी नेहमीच सहकार्य करीत आल्या आहेत.
यंदाच्या महोत्सवात महिलांचे १५० हुन अधिक वस्तूंचे स्टॉल मांडण्यात आले आहेत. याचा आपण सर्वांनी नक्की लाभ घ्यावा व महिला भगिनींच्या उत्साहास प्रोत्साहन द्यावे. यावेळी जनाब बाबासाहेब पाटील साहेब या दिनदर्शिकेचे अनावरण करीत उपस्थितांशी संवाद साधला.