शिरूर खोजमास्टर प्रतिनिधी – फैजल पठाण आयशा बेगम उर्दू हायस्कूल शिरूर (पुणे) या ठिकाणी लिपिक म्हणून कार्यरत असणारे पटेल मुनीर हसन यांच्या 27 वर्षाच्या सेवेनंतर ते निवृत्त होत असताना, त्यांच्या शांत व्यक्तिमत्व, मनमिळाऊ स्वभाव , कामा प्रती निष्ठा ह्या त्यांच्या गुणांमुळे शाळेचे संस्थापक अध्यक्ष इब्राहिम गुलाब नबी शेख (भाईजान) यांनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या सेवेची भेट म्हणून त्यांना व त्यांच्या पत्नीला तीर्थयात्रा (उमरा) घडवून आणण्याचा निर्णय जाहीर केला.
यावेळी बोलताना पटेल म्हणाले की मी हायस्कूलमध्ये सेवा करत असताना एकही दिवस रजा घेतलेली नाही माझी पाचशे दिवसांची रजा शिल्लक आहे, हा क्षण माझ्यासाठी खूप भावनिक आहे. शाळेला ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस मी शाळेसाठी योगदान देइल अशी भावना ही त्यांनी बोलून दाखवली. आठवण म्हणून शाळेला भेट वस्तू दिली.
यावेळी सुसज्ज अशा कॅम्पुटर लॅब चे उद्घाटन आर्किटेक इंजिनियर निसार तांबोळी यांनी केले.
यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक फारूक सांगलीकर, तसेच शिक्षक वृंद, विद्यार्थी व पालक वर्ग व हायस्कूलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ReplyForward
|