गोकुळसिंग राजपूत छत्रपती संभाजीनगर )
येथील फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे सामाजिक बांधिलकी जपणारे नागरिक होळी गुरुवार (ता१३)रोजी सायंकाळी सहा वाजता महात्मा जोतिबा फुले पुतळा परिसरात एकत्र आले,त्यांनी बिडी,सिगारेट, तंबाखू,गुटखा यांकजी रिकामे पाकीट, भिंगरी दारू च्या बाटल्यांचे रिकामे खोके ,बिडी,सिगारे टची थोटके जमा करून त्यांची होळी पेटविली. काम,क्रोध, मोह, मत्सर, अहंकार यांचा धीक्कार करीत होळी पेटविली .”नको आता लाकडी मोळी-व्यसन ,विकारांची करू होळी” “कोरडी होळी खेळू या-पाण्याचा थेंब वाचवू या”अशा घोषणा देत व्यसन व विकारांची होळी पेटविली.प्रथम थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यात जगन गायकवाड, दिलीप अनर्थे, व सामाजिक कार्यकर्ते ठा, धोंडीरामसिंह राजपूत यांनी पुढाकार घेतला. गेल्या दहा वर्षापासून ही मंडळी व्यसन व विकारांची होळी अशाच पद्धतीने साजरी करतात. या प्रसंगी अण्णासाहेब ठेंगडे,प्रमोद पठारे,शैलेश नन्नवरे, अशोक देवकर,राजेंद्र जानराव,अशोक पवार,खंडाळकर, राधेश्याम जगताप, श्री.विश्वासू,श्री हरी महाराज, एस. एम.वाघ,जय पठारे, शिवप्रसाद, श्री जाधव यांच्या सह सामाजिक बांधिलकी जपून समाज कार्य करणारे नागरिक उपस्थित होते.