अकोला:-जिल्हा प्रतिनिधी
बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयात वार्षिक कलाप्रदर्शन फिल्मी रंगतरंग अतिशय जल्लोषात, उत्साहात व अभ्यासपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
कलाप्रदर्शनानिमित्त विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाशी निगडित विविध उपक्रम घेण्यात आले. रुक्मिणी ज्वेलर्स च्या संचालिका स्वाती मते यांनी मिट्टी के रंग फॅशन वॉक हा कार्यक्रम घेण्यात आला. यात रुक्मिणी बँडचे टेराकोटा (मातीची) ज्वेलरी व मृण्मयी बोबडे यांनी हँड पेंटिंग डिझाईन केलेल्या साड्या या शोमध्ये विद्यार्थ्यांनी परिधान केल्या होत्या हा शो घेण्यामागचा उद्देश एकच की विद्यार्थ्यांनी नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःची ओळख निर्माण करावी.महाविद्यालयामध्ये क्ले वर्क, कागद काम बाहुली काम म्युरल वर्क असे विविध विषय चित्रकलेच्या व्यतिरिक्त शिकवले जातात. मिट्टी के रंग फॅशन वॉक साठी नासिक हुन सोनल गावंडे व पूजा फॅशन वर्ल्डच्या संचालिका सौ पूजा राऊत या परीक्षक म्हणून लाभल्या.या फॅशन शो मध्ये प्रथम पारितोषिक महिला गायत्री बेलपत्रे व पुरुष भाविक महल्ले तसेच बेस्ट वॉक साठी अंकित इंगळे यांना पारितोषिक मिळाले. तसेच आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्तर विरांगणार हा फॅशन शो घेण्यात आला तेथेही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कु. गायत्री बेलपत्रे हिला प्रथम पारितोषिक व कुमारी प्राची आहिर हिला द्वितीय पारितोषिक मिळाले. कलारसिकांपर्यंत चित्रकलेचा व हस्तकलेचा प्रसार व्हावा हाच उद्देश बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय व रुक्मिणी ज्वेलर्स यांचा होता.