तेल्हारा:-विशेष प्रतिनिधी
तालुक्यातील घोडेगाव येथे दिनांक १९ मार्च रोजी रात्री ११ वाजे दरम्यान आरोपी विनोद समाधान तेलगोटे राहणार घोडेगाव तालुका तेल्हारा याने शेतीचा हिस्सा मागण्यावरुन आई-वडीलांना मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या त्याचा आईचा मृत्यु झाल्याने विनोद तेलगोटे याच्यावर आता खुनाचे कालम लावण्यात आले आहे.विनोद याने घरासमोर आई वडिलां सोबत शेतीचा हिस्सा मिळावा यासाठी शेतातील पिकाचे पैसे घेऊन सारखा वाद करून आई-वडिलांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने मारून जखमी केले होते. याप्रकरणी २० मार्च रोजी रात्री २.३० वाजे दरम्यान तेल्हारा पोलिसात फिर्यादी विजय समाधान तेलगोटे राहणार घोडेगाव तालुका तेल्हारा यांचे तक्रारीवरून अपराध क्रमांक ००७७/२०२५ भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम ११८ (२), ३५२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. आरोपीच्या जखमी आईस उपचारासाठी जी एम सी नागपूर ड्रामा आय सी यु येथे भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान आरोपीची जखमी आई नामे गोकणार्बाई समाधान तेलगोटे वय ६५ वर्षे यांचा मृत्यू झाल्याने सदर गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ कलम१०३ (१) वाढविण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भटकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.