अकोला:-जिल्हा प्रतिनिधी
माऊली फाउंडेशनतर्फे अकोला वैभव पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. सुरेश राऊत, राजेश गोसावी, उमेश चोरे यांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सुरेश राऊत (जि. प पिंपळगाव हांडे) यांना शाळा स्तरावर गौरवण्यात आले.माझी शाळा सुंदर शाळा हा मुख्यमंत्री शाळेच्या सर्वांगीण उपक्रमात शैक्षणिक गुणवत्ता प्रोत्साहन स्पर्धेत जि. प. प्राथमिक शाळा गोपाळखेड शाळेने पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल मुख्याध्यापक राजेश गोसावी व विभाग स्तरावर नेत्रदीपक शैक्षणिक कायार्चा ठसा उमटवणाऱ्या जि.प. न प्राथमिक शाळा बोडीर्चे मुख्याध्यापक उमेश चोरे यांना पुरस्कार प्रदान करत गौरवण्यात आले. फाउंडेशनतर्फे गौरवण्यात येणाऱ्या पुरस्कारात ११११ रुपये रोख, स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. प्रास्ताविक फांउडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांडेकर यांनी केले. सचिव अशोक पारधी, संचालक मंगेश लांडे, श्रीकांत जोशी, गोपालसिंह ठाकूर, न संचालिका मनीषा शेजोळे, प्रीती मारशेटवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. सूत्रसंचालन सैय्यद रब्बानी यांनी केले.