बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदार संघातील दे.राजा शहरात डॉ. रामप्रसाद शेळके सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश, यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य शेळके यांनी खुला वयोगटात क्रिकेट स्पर्धेत जालना संघाकडून अप्रतिम फलंदाजी करत 102 चेंडू मध्ये 15 चौकार एक षटकारसह 93 धावाची तुफान फलंदाजी केली.ज्योतिरादित्य यांच्या ओपनिंग खेळाची सुरुवात उत्कृष्ट झाली यामुळे पुणे विभागाचा दारुण पराभव झाला.
याबाबत असे की, पंधरा वर्षे वय असताना ज्योतिरादित्य शेळके यांची शरीरयष्टी सुदृढ , कमाल उंची असल्यामुळे क्रिकेट क्षेत्रातील बोनटेस्ट प्रक्रियेनुसार त्यांना सोळा वर्षे खालील वयोगटांमध्ये खेळता आले नाही. त्यामुळे खचून न जात, याच कमजोरीला ताकद बनवत त्यांनी खुलागटामध्ये(ओपन कॅटेगिरी) खेळण्याचा साहस दर्शवले. ज्योतिरादित्य यांनी केलेले हे धाडस म्हणजे 130 प्रति तास वेगाने येणारा चेंडू पंधरा वर्षाच्या मुलांनी खेळायचा .अर्थातच क्रिकेट विश्वातील देव ज्यांना संबोधले जाते असे सचिन तेंडुलकर यांच्या 14 वर्षाच्या क्रिकेट पदार्पण प्रसंगाची जाणीव करून देते.जालना विरुद्ध पुणे विभाग या सामन्यामध्ये आपल्या संघाकडून ओपनिंग करत संघाच्या विश्वासास सार्थ ठरला आहे .यावेळी चौफेर फटकेबाजी करत 15 चौकारासह एक उत्तुंग षटकार लॉंगऑन च्या दिशेने आकर्षक ठरला होता. दुर्दैवाने या सामन्यामध्ये केवळ सात धावा दूर असताना ज्योतिरादित्य यांना आपल्या प्रथम शतका पासून वंचित राहावे लागले.
जालना संघाकडून खेळत असताना ज्योतिरादित्य यांनी मागील दोन सामन्यात 77 चेंडू मध्ये 32 धावा तर 60 चेंडू मध्ये 32 अशी कामगिरी नोंदवली होती. पुणे विभागा विरुद्ध च्या सामन्यांमध्ये ज्योतिरादित्य यांची चौफेर फटकेबाजी पहात विरोधी संघ, प्रेक्षक आवाक राहिले. पंधरा वर्षाचा मुलगा खुला प्रवर्गामध्ये म्हणजेच वीस ते तीस वर्ष वयोगटातील खेळाडूंमध्ये ताशी 130 पेक्षा जास्त वेगाने येत असलेल्या चेंडूचा सामना करत असताना खेळातील क्षण अविस्मरणीय आहेत. क्रिकेट खेळामध्ये सलामी फलंदाजांवर प्रचंड दबाव असतो. सर्वप्रथम फलंदाजाला मैदानावरील पीच ,गोलंदाज यांचा कुठलाही अंदाज नसताना संघाकडून होत असलेली कामगिरी चोख बजावताना धावफलकावर धावसंख्या वाढती ठेवावी लागते. त्याचप्रमाणे पहिल्या काही शतकामध्ये बाद न होण्याचा सुद्धा मानसिक दबाव असतो.
हे सगळं पंधरा वर्षाच्या नवयुवकाकडून सहज सांभाळून 93 धावाची खेळी केली.आपल्या अविस्मरणीय खेळांमधून ज्योतिरादित्य शेळके यांनी जालना संघात केलेली कामगिरीही निश्चितच अविस्मरणीय राहणार आहे. पुणे विभागापुढे खेळत असताना आपले मनोगत मनोबल स्थिर ठेवून खेळामधून खेळाडू असल्याचा परिचय देत पुढील सामन्यात सुद्धा शतकेपार खेळी खेळण्याचे धाडस हा मातृ तीर्थातील उगवता तारा ज्योतिरादित्य शेळके निश्चित करेन
मातृतिर्थातील उगवता तारा.. ज्योतिरादित्य शेळके….
Leave a comment