अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा मागील महिन्यात पार पडला. हा विवाहसोहळा एक चांगलाच चर्चेचा विषय बनला. त्याच्या विवाहातील प्रत्येक कार्यक्रम, पेहराव, सजावट अशा अनेक गोष्टी नंतर ट्रेंड होऊ लागल्या.
हा लग्नसमारंभ थाटामाटात साजरा झाल्यानंतर आता हे कपल हनिमूनसाठी बाहेर देशात फिरायला गेल्याचे समोर आले आहे. त्यांचे काही फोटोजदेखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. त्यातच आता तुम्हाला माहित आहे का? हे कपल निवासासाठी ज्या आलिशान रिसॉर्टमध्ये थांबले, त्याची किंमत काय आहे? नाही चला तर मग जाणून घेऊयात.
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका 12 जुलै रोजी विवाहबंधनात अडकले आहेत. जगभरातील अनेक दिग्गज लोकांनी या लग्नसोहळ्याला आपली हजेरी लावली. विवाह सोहळ्यानंतर अनंत -राधिका पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये उपस्थित होते. त्यानंतर दोघे आता कोस्टा रिकामध्ये हनिमूनसाठी गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 1 ऑगस्ट रोजी कोस्टा रिकाला पोहोचले आहेत.
एका रिपोर्टनुसार, अनंत आणि राधिका हनीमूनसाठी गुआनाकास्टच्या सुंदर परिसरात असलेल्या कासा लास ओलास या आलिशान फोर सीझन रिसॉर्टमध्ये निवासासाठी थांबले आहेत. हा रिसॉर्ट फक्त पाहुण्यांसाठी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा रिसॉर्टच त्याच्या आलिशान सुविधा आणि इथून दिसणाऱ्या सुंदर परिसरासाठी ओळखला जातो. आता इथे राहण्याच्या किमतीविषयी बोलणे केले तर, या रिसॉर्टमध्ये राहण्याचा खर्च प्रति दिवस 25 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
हेदेखील वाचा –
कासा लास ओलास हे प्रीटा खाडीकडे वळणारे एक अद्भूत रिसॉर्ट आहे. यात शहरातील लक्झरी आणि घरातील सुखसोयी यांचा अद्भुत अनुभव अनुभवायला मिळतो. त्याजागी अनेक खजुराची झाडे, मोकळी जागा, सुंदर वातावरण आणि उष्णकटिबंधीय अंगण पाहायला मिळत. बेडरुममध्ये विराडोर बीचचे खडक आणि पाण्याचे सुंदर दृश्य आहे. या ठिकाणी आधुनिक मीडिया रुम आणि एक मोठे मैदानी मनोरंजन क्षेत्र देखील आहे. एवढेच काय तर, या रिसॉर्टच्या मध्यभागी एक भव्य 100 फूट जलतरण तलाव देखील आहे.
अनंत-राधिकाचा शाही लग्नसोहळा फार थाटामाटात साजरा करण्यात आला. असे म्हणतात की, जगातील सर्वात महागड्या लग्नसोहळ्यात हे लग्न उच्च स्थानावर आहे. या लग्नात देशातीलच नाही तर जगभरातील उच्च स्थरीय लोकांना आमंत्रण करण्यात आले होते. निश्चितच हे लग्न एक अद्भुत आणि सर्वात अधिक काळ चालणारे लग्न ठरले. एका रिपोर्टनुसार, अनंत-राधिकाच्या लग्नाला एकूण 5000 कोटी रुपयांचा खर्च झाला.