खरिपातील 55 कोटी व रब्बीतील 119 कोटी रुपये पीकविमा 31 ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांना मिळणार – ना.प्रतापराव जाधव*

Khozmaster
3 Min Read

*बुलढाणा जिल्ह्यातील खरीप व रब्बी 2023 मधील पीकविमा मिळण्याचा मार्ग कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी केला मोकळा!

*केंद्रीय मंत्री मा.ना.प्रतापराव जाधव यांच्या आग्रही पुढाकाराने सर्व लोकप्रतिनिधी व कृषिमंत्री यांची बैठक संपन्न संपन्न झाली.*

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत बुलढाणा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्ह्याचा प्रलंबित विम्याचा प्रश्न निकाली. मुंबई बुलढाणा जिल्ह्यात खरीप 2023 व रब्बी हंगाम 2023 मध्ये विविध प्रकारच्या आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने द्यावयाचा प्रलंबित पीक विमा येत्या 31 ऑगस्ट च्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करण्यात यावा असे निर्देश आज मंत्रालयात आयोजित बैठकीत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित विमा कंपनीस दिले आहेत.

पिक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांचा पिक विमा नाकरायचा असेल तर त्यासाठी ठोस कारण देऊन विशिष्ट मुदतीत पिक विमा नाकारणे बंधनकारक आहे. या अटीचे पालन पिक विमा कंपनीने केले नसल्यामुळे त्यांच्यावर प्रसंगी एफ आय आर करण्यास मागे पुढे बघणार नाही, असा सज्जड दम कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पिक विमा कंपन्यांना या बैठकीत भरला.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव तसेच बुलढाणा जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी यांच्या मागणीच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील खरीप हंगाम व रब्बी हंगाम 2023 मध्ये प्रलंबित पीक विम्याचा विषय निकाली काढण्याच्या अनुषंगाने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत श्री धनंजय मुंडे बोलत होते.

बुलढाणा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडून पिक विमा बाबत हरकती दाखल करण्यास 72 तासांपेक्षा जास्त उशीर झाला असेल किंवा तसेच ज्या शेतकऱ्यांनी ऑफलाइन तक्रारी दाखल केल्या असतील त्या सर्व तक्रारी ग्राह्य धरून 31 ऑगस्ट पर्यंत अपात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांना पात्र ठरवून विम्याची रक्कम अदा करण्याचे आदेश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

या बैठकीतील निर्णयामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम 2023 चे 119 कोटी तर खरीप हंगामातील 55 कोटी रुपये येत्या 31 ऑगस्ट पूर्वी खात्यावर थेट जमा होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. याबद्दल सर्वच लोकप्रतिनिधी यांनी धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत.

या बैठकीस केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, माजी मंत्री आ.डॉ.राजेंद्र शिंगणे,आ.डॉ. संजय कुटे,आ.संजय रायमूलकर, आ.श्वेताताई महाले, आ.आकाश फुंडकर, आ.संजय गायकवाड,कृषी विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती व्ही.राधा, उपसचिव प्रतिभा पाटील, उपसचिव नीता शिंदे, भारतीय कृषी विमा कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक मच्छिन्द्र सावंत, कृषी आयुक्तालयाचे वैभव तांबे, कृषी संचालक विनायकुमार आवटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे, भारतीय कृषी विमा कंपनीचे उपप्रबंधक सचिन हराळ, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे अभिजित उद्धव आदी उपस्थित होते.

#Shivsena #Buldhana #शिवसेना #पिकविमा

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *