हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथे उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यात कोसळला हे बेहद्द दुःखद, क्लेशदायक आणि संतापजनक आहे.. खरंच लाज वाटायला पाहिजे या सरकारला. फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराजांचे नाव वापरून उद्घाटन केल मात्र या पुतळ्याच्या सौंदर्य आणि मजबुतीकरण याच्याकडे दुर्लक्ष केले. अशा बोगस कामे करणाऱ्या सरकारचा जळगाव जामोद येथे शिवप्रेमींनी आज दिनांक २९/८/२०२४ रोजी आंदोलन करून जाहीर निषेध केला.
खरंतर ४०० वर्षांपुर्वी शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गडकोटांचे चिरे ढासळता ढासळत नाहीत आणि त्यांचा पुतळा अवघ्या नऊ महिन्यात कोसळावा. महाराजांचा नुसता हा पुतळा कोसळला नसुन या सरकारचे दुर्दैव कोसळले आहे. सर्वोच्च मानली जाणारी संसद, अनेक विमानतळे, रेल्वे स्टेशन, मंदिरे, ई. ना मागील काही दिवसात गळताना पाहिले.
आणि हाच का तो विकास असा प्रश्न पडतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र या लोकांना माफ करणार नाही.
या संपुर्ण घटनेचा निषेध करत शिवप्रेमी एकत्रित येऊन काळ्याफिती बांधुन सरकारचा जाहीर निषेध केला व दोशींवर कोठोरात-कठोर कारवाई व्हावी यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महामहीम राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले.यावेळी तालुक्यातील अक्षय पाटील सह बहुसंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.