आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे. त्यानुसार राज्यात १२५ जागा जिंकण्याचा निश्चय भाजपने केला आहे. यातील जवळपास ५० जागांवर भाजपला विजयाची खात्री आहे. उर्वरित ७५ जागा जिंकण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ‘मिशन १२५’ला अंतिम स्वरूप दिले जात आहे.आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांशी रविवारी रात्री उशिरा चर्चा केल्याचे समजते. भाजपला कठीण जाण्याची शक्यता असलेल्या ७५ जागांसाठी बैठकीत रणनीती ठरवण्यात आली. शहा यांनी अंधेरी येथील सहारा स्टार हॉटेलमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर भाजप नेत्यांची एक बैठक पार पडली.