अकोला:-जिल्हा प्रतिनिधी
स्थानीय तापडिया नगर परिसरातील डॉ स्त्रीरोग तज्ञ मुकेश राठी यांच्या रुग्णालयात पोटाचा त्रास असलेल्या महिलेच्या गर्भाशयातून तब्बल १६ किलो वजनाचा गोळा काढण्याची अद्भुत शस्त्रक्रिया स्त्रीरोग तज्ञ डॉ मुकेश राठी यांनी नुकतीच पार पाडली. बत्तीस वषार्ची मूलबाळ नसणारी परभणी येथील ही महिला रुग्ण मागच्या दोन वषार्पासून पोटाच्या दुखण्याने दुखी होती. या संदर्भात तिने अनेक उपचार घेतले. मात्र दुखणे बरे होऊ शकले नाही. डॉ मुकेश राठी यांनी या रुग्ण महिलेच्या सर्व तपासण्या करून शस्त्रक्रियेची संपूर्ण जटीलता जाणून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. अतिशय गुंतागुंतीची दोन तास चाललेली ही जटील शस्त्रक्रिया त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये पार पाडली. प्रस्तुत शस्त्रक्रियेत महिलेच्या गर्भाशयातुन साढे सोळा किलो वजनाचा गोळा काढण्यात आला. यात गर्भाशय ला वाचविण्यात आले. यामुळे ती आता आई बनून शकते. शस्त्रक्रिया नंतर अवघ्या सोळा तासात या महिला रुग्णाचे चालणे, फिरणे, खाणे, पिणे सुरू झाले. बिन टाक्याची बिना दुर्बिणी द्वारे गर्भाशयाची शस्त्रक्रिया करण्या साठी प्रसिद्ध असणारे डॉ मुकेश राठी यांना अशा शस्त्रक्रिया व एवढे मोठे ट्यूमर क्वचितच आढळले असून या ट्युमरचा आकार व वजन याची नोंदणी कोणत्या रेकॉर्ड बुक मध्ये होऊ शकते याची पडताळणे करावे लागणार असे सांगितले. एवढ्या मोठ्या आजारातून सुटका झाल्यामुळे या महिलेचे कुटुंब आनंद व्यक्त करीत आहेत.