गायत्रीनगरच्या कीर्तन महोत्सवाचे भक्तिभावात समापन

Khozmaster
2 Min Read

अकोला:-जिल्हा प्रतिनिधी 

श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज बिजोत्सव सेवा समिती, गायत्री नगर, कौलखेडच्या वतीने गायत्री नगरच्या प्रांगणात हभप प्रशांत महाराज ताकोते यांच्या मार्गदर्शनात आयोजित किर्तन महोत्सवाचे सोमवारी मोठ्या भक्तिभावात समापन झाले.या सांगता सोहळ्यात इलोरा येथील हभप तुकाराम महाराज साखरामपूरकर यांनी काल्याचे किर्तन करून कीर्तनाची महिमा आपल्या कीर्तनातून प्रतिपादित केली. सकल जगाच्या कल्याणासाठी सत्संग आवश्यक असून आजच्या युवा पिढीने सत्संगाची कास धरून आपल्या जीवनाचा उद्धार करण्याचे आवाहन केले. या किर्तन उत्सवात हभप सचिन महाराज पवार देहू, हभप शिवाजी महाराज मानकर आळंदी, हभप नाना महाराज कदम नेकतूर, हभप पांडुरंग महाराज घुले देहू, हभप कृष्णा महाराज चवरे पंढरपूर, हभप अशोक महाराज इलक शास्त्री शेवगाव, हभप अनिल महाराज पाटील बार्शी, तथा वारी भैरवगडचे हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी कीर्तन करीत वारकरी संप्रदायाची महती सांगून वातावरण भक्तीमय केले. या महोत्सवात जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी भेटी देत या महोत्सवाचे कौतुक केले. या कीर्तन उत्सवाच्या सामूहिक गाथा पारायण कार्यक्रमात हभप शोभाताई पवार यांनी सहभाग घेतला, तर मृदुंगाचार्य म्हणून हभप विठ्ठल महाराज कावळे आळंदी, हभप अमोल महाराज पेलमहाले आळंदी, हभप ज्ञानेश्वर महाराज  यादगिरे अकोला तर गायनाचार्य म्हणून हभप गोरक्षनाथ गतिर आळंदी, हभप विठ्ठल महाराज भेंडे आळंदी, हभप किशोर महाराज लढे अकोला, हभप दिलीप महाराज काळबागे अकोला व संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ मंडळ देगाव गायत्री नगर, कौलखेड, खडकी, उमरीच्या मंडळांनी सेवा दिली. या उत्सवात गायत्री शक्तीपीठ गायत्री नगर, संत आदिशक्ती मुक्ताई मंडळ कौलखेड, विठ्ठल परिवार अकोला, गुरुदेव सेवा मंडळ अकोला, संत निवृत्तीनाथ महाराज सेवा समिती खडकी, तीन मंदिर महिला हरिपाठ मंडळ गायत्री नगर, महिला भजनी मंडळ गायत्री नगर, शिवमहिम महिला मंडळ गायत्री नगर, बंजारा नगर जेष्ठ नागरिक तथा युवा मित्र मंडळ, ज्येष्ठ नागरिक हरिपाठ मंडळ, गजानन महाराज मंदिर प्रगट दिन उत्सव मित्र मंडळ, गायत्री नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडळ, गजानन गणेश उत्सव मित्र मंडळ हिंगणा आदी सेवा संस्थांनी यात सहकार्य केले. उपस्थित महिला पुरुष भाविकांचे संत जगद्गुरु तुकाराम महाराज बिजोत्सव सेवा समिती, गायत्री नगरच्या वतीने आभार मानण्यात आले. या कीर्तन महोत्सवात पंचक्रोशीतील महिला पुरूष मोठया संख्येने उपस्थित होते.

0 6 7 5 6 5
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

10:07